नमस्कार,
"लिहू आनंदे "या माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
"लिहू आनंदे "या माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
मी उज्ज्वल सुधाकर सराफ भुसावळात माझे
श्री सुधाकर यशवंत सराफ या नावाने
पिढीजात सराफी दुकान आहे .सोने-चांदी
विक्री हाआमचा पारंपारिक व्यवसाय, मुंबईच्या Gemmological
institute of Indiaया संस्थेतून मी Gemmologist(रत्न तज्ञ) ही
पदवी घेऊन रत्न आणि
हिऱ्यांची पारख शिकून रत्नपारखी
ही झालोआहे.
महाविद्यालयीन जीवनात मी अनेक राज्यस्तरीय वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धां मध्ये यशस्वी सहभाग घेतला आहे .तसेच जळगाव आकाशवाणी केंद्रावर नैमित्तिक उद्घोषक म्हणून कामाचा अनुभवही घेतला आहे.
भुसावळातील विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून मी कार्यरत आहे .त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद ,श्रीकृष्ण ,छत्रपती शिवाजी महाराज, चला रत्नांच्या दुनियेत अशा विविध विषयांवर मी व्याख्याने देत असतो.
"लिहू
आनंदे" या माझ्या ब्लॉगच्या
माध्यमातून मी माझ्या व्यवसायामध्ये
आलेले विविध अनुभव, पर्यटनाची आवड असल्यामुळे देशविदेशात
फिरताना अनुभवलेलं जग या ब्लॉगवर
लिहिण्याचा माझा मानस आहे.
No comments:
Post a Comment