चला रत्नांच्या दुनियेत!!! या लेखमालेतील तिसरा लेख
हिरा है सदा के लिये !
हिरा या वस्तू बद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल मिश्रितभीती असते. कुतूहल यासाठी की पुराणकाळातल्या कथांपासून तर आजच्या हिंदी चित्रपटांपर्यंत हिऱ्या बद्दल अनेक अद्भुतरम्य कथा आहेत. आणि भीती यासाठी की हिरा हा अतिप्रचंड किमतीचा असून तो आपण खरेदी करणे तर दूरच पण पाहायला मिळणे देखील दुर्लभ आहे ,अशी समजूत सामान्यतः होती .परंतु१९९० च्या दशकात ही समजूत दूर करण्याचा चंग D Bears या कच्च्या हिऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने बांधला. आणि भारतीय हिरे बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू झाली .खरंतर De bears ही कंपनी पैलू पाडलेले हिरे विकत नाही .तरी देखील टीव्ही आणि वर्तमानपत्रातून ही कंपनी कोट्यावधी रुपयांच्या हिऱ्यांच्या जाहिराती प्रसारीत करु लागली ?D Bears ही हिऱ्यांच्या खनन क्षेत्रातील सर्वात मोठी मक्तेदार कंपनी आहे.आफ्रिकेत विशेषतः दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या खाणी त्यांच्या मालकीच्या आहेत. जगात उत्पादित होणाऱ्या कच्च्या हीर्यापैकी ७० टक्के एवढा प्रचंड उत्पादनाचा वाटा एकट्या D bears या इंग्लंडस्थित कंपनीचा आहे. १९९५साली Dbears वाल्यानी भारतात प्रथमच आपलं जाहिरात कार्यालय थाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतातला हिरे बाजार हा अतिशय संकुचित आणि ठराविक उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित आहे .मग त्यांची मार्केटिंगवाली माणसं कामाला लागली आणि भारतीय हिरे बाजार घुसळून निघाला.चक्क मराठी वर्तमानपत्रात हिऱ्यांच्या जाहिराती झळकू लागल्या. हिरा प्रचंड महाग असतो या समजुतीला तडा गेला. हिऱ्यांची खरेदी सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यात आली.D bears चे प्रयत्न फळाला आले. आणि सोन्याच्या दागिन्यां सोबत सामान्य लोक हिर्याच्या अंगठ्या, पेंडेंटआणि नाकातल्या फुल्या खरेदी करू लागले.
फार पूर्वीपासून भारतात हिऱ्यांना पैलू पाडण्याचा मोठा उद्योग आहे. भारतीय हिरे घसू कारागिरांचे कसब जागतिक दर्जाचे आहे. पूर्वी कच्चे हिरे भारतात येत त्यांना प्रामुख्याने सुरत इथं पैलू पाडले जातंआणि मग ते परदेशात निर्यात होत असत.
जगात हिऱ्यांचा शोध तीन हजार वर्षांपूर्वी प्रथम भारतात लागल्याची नोंद आहे. ब्राझीलमध्ये १७२५ साली हिर्यांची खाण सापडेपर्यंत जागतिक हिरे बाजारात भारताची मक्तेदारी होती .जगात दंतकथा होऊन बसलेले कोहिनूर, आग्रा डायमंड ,ग्रीन ड्रेस्डेन हे सर्व भारतीय हिरे आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत आणि वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथांमध्ये रत्न परीक्षणाच्या शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. हिऱ्यांना पैलू पाडण्याचे कसबही तेव्हापासूनच पारंपारिकपणे आपल्याकडे चालत आले आहे . साधारणतः अठराव्या आणि एकोणिसाव्या शतका दरम्यान भारतातील हिऱ्यांचे उत्पादन जवळपास बंद पडले. आज केवळ मध्य प्रदेशातील पन्ना या हिऱ्यांच्या खाणीतून अल्प प्रमाणात उत्पादन सुरू आहे. पन्ना ही एकाचं वेळी अगदी गरीब पण अतिशय श्रीमंत अशी खाण आहे .गरीब अशाकरता की तेथील हिऱ्यांचे उत्पादन वर्षाला केवळ २०००० कॅरेट इतकच आहे. आणि श्रीमंत अशासाठी की या खाणीत सापडणारे ७०% हिरे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात, इतरत्र हे प्रमाण केवळ ३५ टक्के इतकेच आहे.
हिऱ्याची पारख ही त्याच्या तेजस्वीतेवर ठरते. हिरा सर्वात तेजस्वी आहे . हिऱ्या यासारखी दुसरी कठीण वस्तू जगात नाही. त्याच्या कठीणपणामुळेच त्याला अचूक पैलू पाडता येतात. प्रत्येक गोल हिऱ्याला ५७ पैलू असतात .मग तो कितीही मोठा असो अथवा लहान. अगदी टाचणीच्या माथ्यावर बसू शकेल इतक्या लहान हिऱ्यालाही ५७ पैलू पाडावे लागतात. शिवाय ते ठराविक कोनातच पडावे लागतात. अन्यथा हिरा चकाकत नाही. हिऱ्याची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. मात्र अंधारात देखील हिरा चमकतो ही कल्पना चुकीची आहे. हिरा स्वयंप्रकाशी नाही. अथवा अंधारात चमकायला तो काही छोटा बल्ब किंवा ऊर्जेचा स्त्रोत नाही. मात्र त्याच्यावर प्रकाश किरण टाकले तर तो अंधारातही उजळून निघतो. हिऱ्याची पारख ही ४ महत्त्वाच्या निकषांवर होते . Cut ,carat ,clarity, colour यालाच 4C असेही म्हणतात. हिऱ्यामध्ये देखील विविध रंग असतात. परंतु पांढरास्वच्छ हीराच मागणी च्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या 4c व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा 'सी'असतो तो म्हणजे कॉन्फिडन्स चा 'सी'. अर्थात विश्वासू माणसाकडून हिरा खरेदी करणं.कारण हिऱ्यासारख्या मौल्यवान वस्तूत फसवणुकीचे प्रमाण फार मोठे आहे. हिऱ्यासारखे दिसणारे मातीमोल किमतीचे अमेरिकन डायमंड देऊन सर्रास फसवणूक होत असते. म्हणून विश्वासू रत्नपारख्या कडून खरेदी करणे महत्त्वाचे ठरते.
हिरा हे शुक्राचे रत्न आहे. शुक्राच्या चांदणीसारखं तेजःपुंज ! ऐश्वर्य आणि संपन्नतेचं लक्षण.माणसाच्या पराक्रमात वाढ करणारं ,त्याला तेज प्राप्त करून देऊन त्याच्यासाठी यशस्वितेचा मार्ग सुलभ करणारं एक चिरंतन रत्न!!! म्हणूनच तर म्हणतात A diamond is forever अर्थात हिरा है सदा के लिये !
उज्ज्वल सुधाकर सराफ
हा लेख पण खूपच सुंदर आणि सविस्तर माहितीपूर्ण झाला आहे.सर्वाना हिऱ्याची पारख म्हणजे काय हे समजू शकत नाही.त्यामुळे तुम्ही लिहिलेल्या प्रमाणे 100% विश्वासू पेढी मिळणं हाच योग्य मार्गदर्शनाचा उपाय आहे.अर्थात पुढील लेखाची वाट पाहात आहोत.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखरंच खूप छान माहिती मिळाली. अशीच श्रीकृष्णांवर ज्या स्यमंतक मण्याच्या चोरीचा आळ आला होता त्याबद्दल काही विशेष माहिती मिळू शकेल का? आणि पांडुरंगाच्या गळ्यातील कौस्तुभ मण्याबद्दलही!
ReplyDeleteस्मयमंतकमणी म्हणजे नेमके कोणते रत्न होते किंवा त्याचे रंगरूप कसे होते याचा उल्लेख कुठल्याच पुराणात नाही. फक्त स्यमंतकमणी रोज दोन तोळे सोने प्रसवीत असे असा उल्लेख श्रीमद्भागवतात मध्ये आहे, यावरून तो परीस असावा असा तर्क केला जाऊ शकतो.
Deleteसर फारच सुंदर अभ्यास पर्ण आहे फारच महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहे.अजूनही अशीच माहिती पुढील लेखात मिळेल अशी अपेक्षा आहे.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअत्यंत उत्कृष्ट लेख आहे. 'हीरा' या मौल्यवान वस्तुबद्दल इतकी अभ्यासपूर्ण आणि मोलाची माहिती आपल्या लेखमालिकेतुन आम्हा वाचकांना मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण व उपयुक्त माहिती ����
ReplyDeleteDiamond is a favourite gem of most of the people!!!
अतिशय छान माहिती... माझ्या साठी कुतूहल मिश्रित भिती आणि फक्त सिनेमा पुरता मर्यादित विषय.. असेच आमच्या ज्ञानात अजुन वाढ होण्यासाठी आपण लीहीत रहावे हि विनंती.
ReplyDeleteफारच छान माहिती होती, पुढील लेखाची वाट पाहत आहे, आपल्या मुळे फारच सुंदर माहिती मिळत आहे,
ReplyDeleteहिऱ्यांच्या खाणींचा फोटो पाहून धडकीच भरली मनात! श्रीमंत माणसे पैशाच्या बळावर अंगावर हिरे मिरवतात. पण ते खाणीतून बाहेर काढून त्यांना पैलू च्यडणे, त्यांचे दागिने बनवून विक्री करणे सगळेच खूप कष्टाचे, जबाबदारीचे आणि जोखमीचे काम आहे. तुमच्यामुळे ही माहिती मिळते आहे.
ReplyDeleteKhup chan mahiti ahe.
ReplyDelete