चला रत्नांच्या दुनियेत" या लेखमालेतील लेख क्र. २
रत्नांची जन्मकथा!
रत्न म्हणजे साक्षात वैभव! रत्न म्हणजे सौंदर्याचा मानबिंदू! म्हणून तर "भारतरत्न" हा सर्वोच्च किताब तयार करण्यात आला .रत्नांच्या या नवलपूर्ण दुनियेत पाउल टाकताना रत्नांची उत्पत्ती कशी होते? हे जाणून घेतले पाहिजे. लाखोंवर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. त्यावेळी पृथ्वी म्हणजे लाव्हा रसाचा तप्त गोळा होती.कालांतराने पृथ्वीवर वातावरण निर्मिती होत गेली. आणि हळूहळू लाव्हारसा चे रूपांतर खडक आणि खनिजांमध्ये होत गेले .पृथ्वीच्या पोटातील उष्णता आणि वरून असणारा जमिनीचा भार यामुळे ठराविक ठिकाणी भूगर्भीय प्रक्रिया होऊन रत्नांचा जन्म पृथ्वीच्या पोटात होऊ लागला .विशिष्ट प्रकारची खनिज संयुगे, उष्णता, गॅस आणि जमिनीचा प्रचंड भार यामुळे निर्माण होणाऱ्या रत्नांना आकर्षक रंग आणि चकाकी प्राप्त झाली. भुगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे पृथ्वीच्या पोटातील ही रत्ने काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मार्गातून बाहेर आली आणि मानवाला रत्नांचा शोध लागला. वैशिष्टपूर्ण रासायनिक मिश्रणामुळे रत्न धारण करणाऱ्यांना आश्चर्यकारक फायदे मिळू लागले. आणि मग रत्नांसाठी चक्क लढाया सुरू झाल्यात.
रत्ने जशी दगड आणि खनिजां पासून बनतात तशीच काही जैविक रत्ने सुद्धा आहेत .उदाहरणार्थ मोती, पोवळा, अंबर इ.रत्ने जैविक म्हणजेच सजीवांपासून बनलेली आहेत. मोती हे रत्न समुद्रातील शिंपल्यात राहणाऱ्या कालवा पासून बनते तर पोवळा हे कोरल नावाच्या समुद्री वनस्पती मध्ये सापडते. अंबर हे दुर्मिळ रत्न झाडातून पाझरणाऱ्या द्रव्यापासून बनते. जगप्रसिद्ध जुरासिक पार्क चित्रपटातील डायनासोर जन्माची कथा अंबर या रत्ना पासून सुरू होते. एका शास्त्रज्ञाला हजारो वर्षांपूर्वीचे अंबर रत्न सापडते आणि त्या रत्नात एक डास असतो जो डायनासोर ला चावलेला असतो आणि त्याच्या पोटात डायनासोरचे रक्त असते डायनासोरचे डी एन ए त्या रक्तातअसतात. त्या अंबर रत्नातून डीएनए बाहेर काढून त्यापासून पुन्हा डायनासोर जन्माला घातला जातो असे कथानक चित्रपटात दाखवले आहे. मध्यंतरी चीनमध्ये खरोखरच अशा प्रकारचे अंबर रत्न सापडले परंतु त्यातील डी एन ए पासून डायनासोर ची निर्मिती करणे अजून तरी शास्त्रज्ञांना जमले नाही .
रशियातील सेंटपीटर्सबर्ग या शहरापाशी पुष्किन पॅलेस (कॅथरीन पार्क) नावाचा एक सुप्रसिद्ध राजमहाल आहे. या महालातील एक दालन अंबर हॉल म्हणून प्रसिद्ध आहे.त्या दालनाच्या भिंती आणि छतावर सर्वत्र अंबर रत्न जडवलेले आहे. अतिशय मनमोहक कारागिरी आणि थक्क करून टाकणारा हा अनुभव मी घेतलाआहे.
रत्नांची उत्पत्ती स्थाने जगभरात विविध ठिकाणी आहेत त्यामुळे एकाच जातीच्या रत्नांमध्ये रंगांच्या विविध छटा बघायला मिळतात .जसे झांबियन पाचु हा गडद हिरवा असतो .तर कोलंबियात सापडणारे पासु फिकट हिरव्या रंगाचे असतात. ब्राझीलमध्ये सापडणाऱ्या पाचूत पारदर्शकता कमी असते. अशा प्रकारे एकाच रत्नात त्याच्या विविध खाणीं प्रमाणे रंग, पारदर्शकता आणि तेज यांच्यात फरक पडत जातो .ज्योतिषशास्त्रात एकूण ८४ प्रकारची रत्ने सांगितली आहेत .मात्र प्रत्यक्षात दोन हजाराहून अधिक प्रकारची रत्ने पृथ्वीच्या पोटात दडली आहेत. म्हणून तर पृथ्वीला रत्नगर्भा असेही म्हटले जाते.
या दोन हजार प्रकारच्या रत्नांमध्ये नवग्रहांची केवळ नऊ रत्ने प्रमुख अथवा मौल्यवान समजली जातात. भृगूसंहितेमध्ये रत्नांचा संबंध विविध ग्रंहांशी जोडलेला आहे .सूर्य(रवी )-माणिक, चंद्र (सोम)- मोती ,मंगळ -पोवळा ,बुध-पाचू, गुरु- पुष्कराज, शुक्र-हिरा, शनि- नीलम ,राहू-गोमेद,केतू- वैडूर्य (लसण्या) या सर्व रत्नांची वैशिष्ट्ये, संयुगे ,काठिण्य विशिष्ट घनता वेगवेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची पारख करणे शक्य होते.आजपर्यंत केवळ अनुभवातून अथवा परंपरेतून आलेल्या ज्ञानातुन रत्नांची पारख करण्यात येत असे मात्र आता विज्ञानयुगात विविध वैज्ञानिक कसोट्यांवर रत्नांची पारख केली जाते आणि ती सर्वात विश्वसनीय पद्धत आहे. मुंबईतील Gemmological institute of India या नामांकित संस्थेद्वारे Gemmology अर्थात रत्नशास्त्र या विषयावर अभ्यासक्रम तयार करून कोर्सेस शिकवले जातात .अनेक प्रकारच्या रत्नांची पारख कशी करावी याचे शास्त्रीय शिक्षण तेथे दिले जाते .आपल्या काटेकोर अभ्यासक्रम पद्धतीमुळे आज जगभरातून अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात प्रस्तुत लेखकाने या संस्थेतून जेमॉलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे .रत्नांची जगभरातील वाढती मागणी आणि दुर्मिळता यामुळे रत्नांच्या बाजारपेठेत फसवणुकीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे .सामान्य ग्राहकांना रत्नांची पारख नसते त्याचा गैरफायदा काही लोक घेतात तर बऱ्याच वेळा स्वतः रत्नांची विक्री करणाऱ्यांस आपण कोणत्या प्रकारचे रत्न विकतो आहोत याचे ज्ञान नसते. अनेक ठिकाणी खऱ्या रत्नां सारखे दिसणारे खोटे रत्न बनवण्याचे लघू उद्योग आहेत तर बऱ्याच वेळी काचेच्या तुकड्यांचा रंग देऊन पैलू पाडून त्यांची विक्री केली जाते. यामुळे रत्न खरेदी करताना सावधानता बाळगणे जरुरीचे असते पुढील लेखांमध्ये आपण विविध रत्नांची वैशिष्ट्ये उत्पत्ती स्थाने आणि त्यांची पारख कशी करावी याची माहिती घेऊया.
उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologists (रत्नतज्ञ)
Waah kya baat hai sir. Khupach chhan mahiti ahe.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteउज्ज्वल इतकी दुर्मिळ आणि ज्ञानसंपन्न अशी रत्नांची माहिती तुमच्यामुळे सर्वांना कळतेय.अर्थातच लेख अत्यंत वाचनीय आणि बहुमूल्य आणि संग्रही ठेवावा असाच आहे.तुमच्या पेढीवर अशी खात्रीचीच रत्ने मिळतात.
ReplyDeleteउज्वल खूप छान माहिती देतो आहेस .अजून तुझे लेख वाचायला आवडतिल
ReplyDeleteधन्यवाद! या लेखमालेतील उर्वरित लेख ब्लॉगवर टाकेन
Deleteउपक्रम खुप छान माहीती ऊपयुक्त.लिहीत रहा.
ReplyDeleteधन्यवाद! या लेखमालेत अजून लेख लिहीण्याचा मानस आहे
DeleteTruely valuable information
ReplyDeleteThanks
DeleteKhup chan lek ahe.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteDada khup chan..khup Sundar mahiti milali.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखरच खूप माहितीपूर्ण लेख आहे.रत्नांच्या दुनियेतील अदभूत माहिती मिळाली .
ReplyDeleteधन्यवाद! निरज
ReplyDeleteखुप सुंदरआणि महत्वाचे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान माहिती यावर कधी विचार केला नाही होता
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख
ReplyDeleteखूपच,अभ्यासपूर्ण,माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट लेखन. हिर्याबद्लची खूपच सविस्तर आणि बोधप्रद महिती मिळाली. हिर्याबद्लची सर्वसाधारणांमधे असलेली अनभिन्यता आपण दूर करून एकप्रकारे जनजागृतीचेच कार्य केलेले आहे.4Cचे निकश पाळले तर फसगत होण्याची शक्यता फारच कमी. आपला व्यासंग व विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आमच्यापर्यंत पोहचवणे ही मानवसेवाच म्हणावी लागेल. असेच बोधप्रद लिखाण वाचण्याची संधी आम्हांस वारंवार मिळो हिच ईच्छा. शतशः धन्यवाद.
ReplyDeleteखूप नाविन्यपूर्ण माहिती वाचायला मिळते. त्यामुळे उत्सुकता वाढते. ��
ReplyDeleteखूप नाविन्यपूर्ण माहिती वाचायला मिळते. त्यामुळे उत्सुकता वाढते. 💐
ReplyDeleteChaan mahiti aahe . Kadhi Ratnanbadal vichar nahi kela hota..
ReplyDelete