Pages

Thursday, May 21, 2020

मदनबाण

                       





आमच्या बागेत मोगऱ्याचं एक छोटं झाड बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याला उन्हाळ्यात अगदी मोजकी फुलं येतात. त्याच्याच शेजारी हजारी मोगर्‍याचं ही एक झाड आहे . नाव हजारी मोगरा आहे ,म्हणजे याला किमान पाचशे फुलं तरी येतील म्हणून मोठ्या आशेने लावला... पण एक फूल येईल तर शपथ !  नाव मोठ्ठम् लक्षण खोट्टंम्!   त्याच्याच बाजूला आहे वेली मोगरा,  त्याचा वेल ठीकठाक वाढला आहे . पण फुलं काही फारशी येत नाहीत त्याला. अलीकडे मला कळलं की याला वेली मोगरा म्हणत नाहीत, त्याचं खरं नाव आहे "मदनबाण"
 मात्र पानं अगदी मोगऱ्या सारखीच!

झाडांना भाव-भावना असतात म्हणे. मी त्यावेळी वेलीमोगऱ्यापाशी  म्हणजे मदनबाण पाशी गेलो त्याला म्हटलं मित्रा सॉरी !!  आम्ही उगीचच तुला वेली मोगरा म्हणायचो आज तुझं बारसं करुया तुझं नाव आजपासून मदनबाण ..कुsssरsss  .....              झालं !  बारसं झाल्याबरोबर स्वारी भलतीच खुश झाली. मग काय हीsss भरभरून फुल आमच्या मदनबाणला येऊ लागली. मी चाटच झालो .आमचे देवघर मदनबाण च्या फुलांनी भरून जाऊ लागले. दिवसभर देवघरात नुसता घमघमाट. देव पण खुश झालेएत आमचे.

मग माझ्या मनात विचार आला...
नुसतं बारसं केलं तर हा खूष होऊन एवढी फुलं देऊ लागला......
याचं लग्न करायचं म्हटलं तर काय बहार होईल......
स्वारी खुश होऊन रोज खंडीभर फुल देईल.....
तेव्हापासून माझ्या या सुगंधी मित्रासाठी मी स्थळ शोधतोय....
तुमच्या पाहण्यात कोणी आहे का चांगलं स्थळ?....
असेल तर सुचवा .....                  
मदनबाणाची थोडी फुलं तुम्हाला पण देईन म्हणतो.

उज्ज्वल सराफ(भुसावळ)
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे पण अवश्य वाचा.....








6 comments:

  1. उज्वल दादा तुम्ही खूप छान लिहीता.वक्तृत्वासोबत अनेक गुण आत्ता लक्षात येत आहेत.पुन्हा रत्नशास्त्र आणि पेढी उत्तम चालविणे.....कमाल आहे बाबा

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहिलं आहे , झाडांची आवड असली की अजून छान वाटतो लेख 👌

    ReplyDelete
  3. जाई किंवा सायली कशा वाटतात मदनबाणकरिता?
    मावसबहिणी आहेत, एक निवडावी. 😊

    छान लेख उज्ज्वल !!

    ReplyDelete
  4. कांदापोह्यांचा कार्यक्रम करूया, मग ठरवू,😄

    ReplyDelete