"सौंदर्याधिपती मोती" (चला रत्नांच्या दुनियेत या लेखमालेतील लेख क्र.५)
स्वाती नक्षत्रात झरणाऱ्या पावसाचा थेंब जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. हि कवीकल्पना आपल्याकडे जनमानसात रूढ आहे. अर्थात वास्तविकता तशी नाही. कवीकल्पनाच ती, "जे न देखे रवि ते देखे कवी" पण या कवी कल्पनेत देखील एक गर्भित अर्थ आहे.तो असा की, स्वाती नक्षत्र हे साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येते .भारतीय उपखंडात यावेळी पाऊस सहसा पडत नाही. तरीदेखील या नक्षत्रात पाऊस पडलाच आणि समुद्रात तरंगणाऱ्या शिँपल्यात पावसाचा थेंब गेला . इथेपण दुर्मिळता अशी की शिंपले हे समुद्रतळाशीच राहतात ते पृष्ठभागावर सहसा येत नाहीत .तरी पण जर ते पृष्ठभागावर आले ,त्यावेळी स्वाती नक्षत्र असले, आणि नेमका पाऊस पडलाच आणि त्यातही शिंपल्याचे तोंड उघडे असले ( ते बहुधा बंदच असते) आणि त्यात पावसाचा थेंब शीरला तर त्याचा मोती होतो. अर्थात इतक्या नियम अटी जर-तरच्या भिंती पार करून मोती तयार होतो. म्हणजे तो किती किती दुर्मिळ असावा हे कवीला त्या " स्वाती नक्षत्राच्या पावसाने मोती बनतात" यातून सांगायचं आहे. असे लाखो शिंपले गोळा करून त्यातल्या एखाद्यात मोती सापडतो. लाखात एक देखणी! तसला हा प्रकार. मग ते मोती राजा विकत घेणार, त्याचा कंठा गळ्यात धारण करणारा, म्हणजे किती मौल्यवान तो मोत्याचा कंठा !!
आणि मग राजाच्या कानावर एखादी गोड बातमी आली तर खुश होऊन राजा तो मोत्याचा कंठा ती गोड बातमी सांगणाऱ्या दासीला खुश होऊन देऊन टाकणार ,अशा कथा आपल्याला पौराणिक साहित्यात जागोजागी सापडतात.
टपोरा गोल पांढराशुभ्र आणि चमकदार मोत्याचं आकर्षण आपल्याकडे पूर्वापार आहे. अशा या मोत्याची जन्मकथा काय आहे? निळाईची दुलई घेऊन अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात अद्भुत जीवसृष्टी नांदते आहे. यात अनेक प्रकारचे प्रवाळ, शंख, शिंपले हे जीव देखील राहतात. या शिंपल्यात पिंक्टोडा जातीचे जे शिंपले( कालव) असतात ते नैसर्गिक मोती बनवतात. या शिंपल्यांची रचना आपल्या सुटकेस सारखी असते. त्यांचं तोंड अधून-मधून उघडत आणि त्यावेळी जर एखादा टणक बाह्यपदार्थ त्या शिंपल्यात शिरला तर त्या शिंपल्यात राहणाऱ्या मांसल कालवाला तो कण टोचू लागतो. मग त्याच्या पेशी त्या कणावर शुगर कोटेड गोळीसारखं नेकर नामक पांढऱ्या स्त्रावाचं आवरण चढवतात. ही प्रक्रिया २/४वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू राहू शकते. आणि त्यातूनच नैसर्गिक मोत्याची (sea water pearl)निर्मिती होते.
श्रीलंकेत मनारच्या आखातात असे नैसर्गिक मोती बनत असत. पण पार्शियाच्या आखातात बनणारे इराणच्या बसरा नामक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बंदरातील मोती जगप्रसिद्ध आहेत. आजही नैसर्गिक मोत्यांसाठी बसरा मोती हाच शब्द रुढ आहे. वास्तविक युद्धजन्य परिस्थितीमुळे आता बसऱ्या हून मोती येणं बंदच झालंय. त्याऐवजी दक्षिण अमेरिकेतल्या वेनेजुएला देशातून नैसर्गिक मोती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतात. २०१७ साली इथे नोटबंदी झाली. त्यावर जनक्षोभ उसळला वेनेजुएलाची घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था या नोटबंदी मुळे साफ कोलमडली. (मोदींची कॉपी करायला गेले आणि तोंडावर आपटले) तेव्हापासून वेनेजुएलन मोत्याचं दर्शनही दुर्लभ झाल आहे.
दुर्मिळात दुर्मिळ असणाऱ्या या नैसर्गिक मोत्यांवर जपानने एक नामी इलाज शोधून काढला. तो म्हणजे संश्लेषित (cultured )मोत्यांचा. हा मोती देखील शिंपल्यातच बनतो.फक्त या मोत्यात बाह्यकण आत जाण्याची वाट न पाहता शिंपल्याचे तोंड उघडून त्यात तो घुसवला जातो. पुढची प्रक्रिया निसर्गनियमाप्रमाणे होते आणि मोती जन्मतो. एक प्रकारे ही मोत्यांची शेतीच असते .पाण्यात जाळी लावून जपान आणि नंतर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आणि आता भारतातही काही प्रमाणात मोत्यांची शेती होते. या शेतीमुळे मोत्यांची दुर्मिळता संपली. आणि अक्षरश: पोत्याने मोत्यांची पैदास होऊ लागली. आज या कल्चर्ड मोत्यांनी सगळी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे .नैसर्गिक मोत्यांपेक्षा स्वस्त मस्त आणि टिकाऊ व चमकदार असलेले हे मोती fresh water pearl म्हणून ओळखले जातात. हैदराबाद येथे या मोत्यांची ड्रिलिंग इंडस्ट्री उभी राहिली आहे. चीनमधून हे मोती आयात करून त्यांना छिद्र पाडण्याचं काम हैदराबादेत मोठ्या प्रमाणात चालतं. त्यामुळे आपल्याकडे हैदराबादी मोती असं नाव कल्चर्ड मोत्यांसाठी रूढ झालय. कल्चर्ड मोत्यांमधे अलीकडे चक्क चौकोनी( cube) आकाराचे मोतीही मिळू लागले आहेत. विविध रंगांचे हव्या त्या आकाराचे मोती सहज उपलब्ध होतात. मोत्यांचा एक सारखा आकार आणि त्याची चमक यावरून मोत्याची प्रत व कींमत ठरवली जाते.गोल आणि एक सारख्या आकारांचे मोती कीमतीला थोडे महाग मिळतात. मात्र वेडावाकडा आकार असेल तरच मोती खराअसतो असा चुकीचा समज जनमानसात आहे.
कल्चर्ड मोत्यां व्यतिरिक्त प्लास्टिक /फायबर दाण्यांवर रसायनांचा थर देऊनही सेमीकल्चर मोती मोठ्या प्रमाणात तयार होतात. खर्या मोत्यांपेक्षा हे मोती आकर्षक आणि चमकदार दिसतात. त्यामुळे दागिन्यांमध्ये याच मोत्यांना मागणी अधिक असते .तन्मणी, चिंचपेटी ,मोत्यांचे कुडे,लफ्फा, नथ अशा विविध महाराष्ट्रीय मोत्यांच्या दागिन्यांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे .महिलांचे सौंदर्य खुलवण्याचे काम मोती करतो. कारण त्यात एक प्रकारचा सोज्वळ घरंदाजपणा आहे. मोत्यांचे मोहक दागिने सौंदर्यवतींच्या सौंदर्याला शतगुणित करतात. म्हणून तर मोत्याला सौंदर्याधीपती मोती म्हटलं आहे.
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मोती हा चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. चंद्राप्रमाणे शुभ्रधवल, तेजस्वी शांत प्रवृत्तीचा !! चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून मनाशी संबंधित सर्व कारणांसाठी मोती वापरण्याचा सल्ला ज्योतिषी देत असतात. मन एकाग्र करणे, रागीट स्वभाव शांत करणे, मनाची अस्थिरता, चंचलता नाहीशी करणे. या कारणांसाठी मोती चांदीच्या अंगठीत करंगळीत अथवा अनामिकेत धारण केला जातो. माणसाने आपल्या मनावर ताबा मिळवीला म्हणजे त्याला सर्व सुखं प्राप्त होतात असं सांगितलं जातं. म्हणूनच तर बहुसंख्य लोक सुखाच्या शोधार्थ मोती वापरतात.
उज्ज्वल सुधाकर सराफ
रत्नतज्ज्ञ (Gemmologist)
ReplyDeleteसौ. रागिणी पुराणिक
मोत्यांची ते कसे तयार होतात इथपासून सखोल माहिती मिळाली.अर्थात तुमच्या खास उत्तम लेखनशैलीतून माहिती मिळते. मोत्यांच्या दागिन्यानी मढलेली स्त्री खरंच एकदम प्रसन्न आणि शांत वाटते.मोत्यांचा परिणाम जाणवतो. माझी एक शंका-मोती हे जैविक रत्न आहे त्यामुळे त्याला इतर रत्नांसारखा कायम टिकाऊपणा असेल का.
मोत्याची काठिण्यपातळी अगदी कमी आहे त्यामुळे त्याच्यावर इतर रत्नांच्या तुलनेत चरे लवकर येतात. तसेच परफ्युम किंवा इतर केमिकल्सचा ही परिणाम होतो.
Deleteफारच सुंदर माहिती मिळाली आहे काका तुमच्या कडून, अगदी नेहमी प्रमाणे, जसा सर्वांचा समज आहे अगदी माझाही असाच होता की पावसाचे पाणी जाते वगैरे असा,
ReplyDeleteVery minutely detailed informatiom
ReplyDeleteThanks
DeleteVery nice knowledge about pearls.
ReplyDeleteThanks
Deleteमोत्यांवरील लेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण वा रंजक वाटला!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप सुंदर माहिती आहे दादा
ReplyDeletePallavi Wakankar..🙏
ReplyDeleteVery nice knowledge about pearls.👍👍👏
Khup sunder mihiti aani Moti tar kharch sunder asto aani jo Moti vaprto to shant hoto he pan khare aahe
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसमुद्रामधील शिंपल्यात मोती तयार होतो आणि स्वाती नक्षत्रात पडणार्या पावसाच्या थेंबापासून निर्माण होणारा मोती अनमोल असतो असे आतापर्यंत ऐकिवात होते.परंतु आपल्या आजच्या लेखातून अनमोल मोती म्हणजे काय आणि मोत्यांची निर्मिती कशी होते याबद्दल खूप मौल्यवान माहिती मिळाली.धन्यवाद.
ReplyDeleteअनिल वांबोरीकर,मुंबई
धन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteKhup Chan mahiti Dada..
ReplyDeleteधन्यवाद!!!
Deleteखुप छान माहिती मिळाली दादा
ReplyDelete